Monday, April 16, 2012

२१ मे फुआलपानी, २२ मे- झीरमी

आमच आजच्या दिवसाच टार्गेट ते म्हणजे ९५०० फुट उंचावरील ‘फुआलपानी कॅम्प’. सकाळी सगळ वेळेत आटपून, टेंट वगेरे साफ करून आम्ही नाश्ता केला, त्या दिवशीच जेवण डब्यात भरल, आणि सकाळी ७.३० रांगेत उभे राहिलो. सेनापती सोमण काकांनी आमच्या ग्रुप च्या वतीने कॅम्प लीडर आणि त्यांच्या आचारी वर्गाचे आभार मानले आणि त्यांना अलविदा करून फुआलपानी कडे रवाना झालो. वास्तविक वळण हे फार नागमोडी होते, नेहमीप्रमाणे आमचे जोशी ग्रुप चे शिलेदार पुढे गेले आणि मी रमत गमत चालू लागलो. वास्तविक माझ जड सामान मला त्रास देत होतच, आदल्या रात्री मी ‘आयोडेक्स’ लावल होत आणि वैद्य श्रीकांत कडून ‘रिली स्प्रे’ खांद्याला मारून घेतला(हे रोजच चालू होत, पण कुणाची मदत घ्यायची नाही हा माज आडवा आल्याने कुणाला मदत मागितली नाही आणि तसच निभावल). वास्तविक माझा उजवा खांदा निखळला असल्याने, चढावर खूप ताण यायचा, तेव्हा श्रीकांत आणि बाकी जोशी मंडळीनी मला पोर्टर घायची सूचना केली(आमच्या ग्रुप मधील कविताने घेतलेला असल्याने) आणि माझी खिल्ली उडवायला लागले, पण पुण्याचे रक्त अंगात असल्याने आणि चिकाटी असल्याने मी दुर्लक्ष केल(हे चिडवण रोज असायचं श्रीकांतच पण त्याला काही दाद दिली नाही मी). वास्तविक ते जंगल म्हणजे फक्त सूचीपर्णी वृक्षांची दाटी होती, अत्यंत गर्द आणि घनदाट. त्या वाटेत मी अर्जीन्दार उर्फ सोनू बरोबर मराठा आणी शिखांचा इतिहास, शिवाजी महाराज, शीख पद्धती वगेरे वर तात्विक चर्चा केली चालता चालता. मध्येच गुजराती मंडळीनी मला त्यांच्या खाण्याच्या ब्रेक मध्ये सामील व्हायचा आग्रह केला आणी मी काही नमकीन पदार्थ त्यांच्याबरोबर खाल्ले. साधारण ४ च्या सुमारास आम्ही फुआलपानी स्पॉटला पोहोचलो. वास्तविक तो कॅम्प म्हणजे १ टेकडीच होती. टेकडीवर एक मोठा उतार आणी उतर संपल्यावर लगेच आमचा टेंट. टेंट ची रचना पण फार विचित्र होती. फुआलपानी चे वैशिट्य म्हणजे इथे सर्व गोष्टीना ट्रेकिंग करावे लागते. जेवण,पाण्याचा नळ, अगदी नैसर्गिक विधिना सुद्धा. प्रत्येक वेळेला चहा,सूप,जेवणासाठी सुद्धा मोठा चढ चढून जावे लागत असे. या कॅम्पचे मुख्य आपला ‘मराठी माणूस’ श्री कुलकर्णी म्हणून होते. वास्तविक ते मुंबईतील बांद्र्याचे पण कायमचे दिल्लीत स्थायिक झालेले. त्यांनी मराठी मंडळी पाहून आपणहून आमच्या टेंट मध्ये येऊन आमच्याशी गप्पा मारल्या.(तेव्हा आमचा राज ठाकरे वाद नेमका टेंट मध्ये चालू होता, मी राजसाहेबांचा एकांडा शिलेदार मंदार-गौरव-प्रसाद च्या आरोपाना सामोरा जात होतो). त्यांनी दिल्लीत ही खूप मराठी माणस राहत असल्याचे सांगितले अगदी निर्भयपणे त्यामुळे ऐकून बर वाटल. त्या दिवशी कॅम्प फायर ही अंधारात करावी लागणार होती ती पण एका टेकडीवर(तिथे पण ट्रेकिंग). आमच्या जोशी मंडळीनी काही रस दाखवला नाही आणी जेवण झाल्यावर एकजात सगळे आडवे झाले, पण मी गाणी वगेरे म्हणण्यात पहिल्यापासून अग्रेसर असल्याने मी एकटाच गेलो. किर्र काळोख असल्याने आणी त्यादिवशी जरा दगदग झाल्याने फार कमी मंडळी कॅम्प फायरला आली. तिकडे मी हैप्पी च्या आग्रहावरून शंकर महादेवन चे ‘ब्रेथलेस’ गाण सदर केलं. वास्तविक ९५०० फुटावर इतक्या विरळ ऑक्सिजन असताना सतत ३-४ मिनिट गाणे हे मोठे आव्हान होते आणी ते मी यशस्वीपणे पेलले. त्याचे फार कौतुक झाले(म्हणून शेवटच्या दिवशी पण मला सर्वांसमोर गायचा आग्रह झाला). तिकडे आम्ही कुठली जुनी-पुराणी गाणी आठवून किर्र काळोखात म्हणत होतो आणी थंडीत त्याची मज्जा अजूनच येत होती. शेवटी मातृभूमीच्या प्रीत्यर्थ कॅम्प फायर चा शेवट मी

काल जरा सुखाने झोपल्याने सकाळी जरा उशिरा जाग आली, प्रसाद ने फटके मारून उठवलं. उठल्यावर पाहतो तर आमचे अप टू देट मंदार शास्त्री साहेब आवरून तयार होते. मग पटापट मे आवरून टेंट साफ केला. नाश्ता केला आणी डब्यात जेवण घेतलं. ७.३० ला कुलकर्णी सरांना आणी फुआलपानी ला जय महाराष्ट्र केला. आजचा प्रवास ९५०० फुट फुआलपानी ते ११००० फुट झीरमी असा होता. आम्ही जसजसे उंच उंच चढत होतो तसा Altitude sickness ची काही लक्षण काही जणांमध्ये दिसायला लागली. कानडी मंडळीतील राजलक्ष्मी हिला पित्त होऊन उलटी चा त्रास झाला मग त्या दिवसापुरता बाईनी पोर्टर घेतला. हैप्पी लं सुद्धा थोडफार मळमळत होतच. तसेच सर्वात जेष्ठ अश्या मा-१ आणी २ यांना पायदुखीचा त्रास व्हायला लागला. तेव्हा आमच्यातील वैद्य श्रीकांत जोशी याने सर्वाना वैद्यकीय उपचार करून दिले आणी सर्वांचे आशीर्वाद मिळवले.(नंतर डॉक्टर साहेबाना फार डिमांड आली). वाटेत आज प्रथम आम्हाला पर्वत शिखरावरून घसरत आलेला बर्फ एका सपाट जागी साचलेला मिळाला. मग बर्फ दिसल्यावर सर्वाना चेव आला. २ गात कडून एकमेकांना बर्फाचे गोळे करून मारायचा खेळ चालू झाला. आमच्यातील श्रीकांतराव जरा जास्तच उत्साह दाखवत खेळत होते(तसा तो प्रचंड शांत थोडासा संथ आहे.) त्यात गम्मत अशी झाली कि खेळता खेळता श्रीकांतच्या डोक्यावरचा गॉगल पडला आणी साहेबाना निघायच्या वेळी आठवल कि आपला गॉगल हरवला. मग सगळ्यांची शोध मोहीम चालू झाली. मी जरा नेहमीप्रमाणे तिरक डोक चालवून भलत्या ठिकाणी शोध घ्यायला लागलो, तेव्हा मला बाकीच्यांनी तिकडे पडण शक्यच नाही गॉगल’’ असा शेरा मारला, आणी एका दगडाच्या थोड आतमध्ये मला काहीतरी कळ्या रंगाची वस्तू दिसली. तो नेमका श्रीकांतचा गॉगल होता. तोपर्यत सर्वानी आशा सोडून पुढे वाटचाल चालू केली होती, तेवढ्यात मी गाजावाजा न करता शांतपणे श्रीकांतच्या हातात(माज दाखवत) गॉगल टेकवला(त्यानंतर सहसा त्याने माझी खेचली नाही). त्या दिवशीची चढण ४५ अंशाची सरळ होती, आणी जेवण झाल्यावर चढायला फार कठीण जात होते(आणी बर्फात खेळल्याने सर्वांचा बोका गार झालेला). आज सकाळी ट्रेक चालू करताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पावसाळी ट्रेकचा अनुभव सुद्धा मिळाला. आधी सांगितल्याप्रमाणे इथे हवा तासागणिक बदलते. त्यामुळे लगेच थोड्यावेळात उन येऊन आम्ही चक्क ३ इंद्रधनुष्य एकाच वेळी पाहू शकलो. नुकत्याच पावसामुळे प्रसन्न झालेली हिरवळ आणी पायाखालच्या गवतावर आणी झुडुपाच्या पानांवर मोत्यासारखे चमकणारे टपोरे पाण्याचे थेंब मला चढ पार करायला उर्जा देत होते. वर पाहिलं कि दिसणारी बर्फाच्छादित हिमशिखरे, अभ्राच्छादित आकाश, हिरवीगार घनदाट झाडी असे सौंदर्य म्हणजे एक अप्रतिम सुखाची अनुभूतीच होती.

एकदाचे ४ वाजता झीरमी ला पोहोचलोच. आता मला जरा जमिनीपासून बरच वरती आल्याचा फील आला होता. तिकडले कॅम्प लीडर हे सुद्धा आपले मराठी गृहस्थ नाशिकचे श्री मुलमुले म्हणून होते. त्यांनी आमचे स्वागत केले. संध्याकाळी नाश्त्याला चहाबरोबर गरम गरम बटाटे वडे होते. झीरमी सुद्धा अत्यंत सुरेख जागा होती. त्यात कॅम्प लीडरने सांगितले कि इकडे रात्री अस्वलं येतात त्यामुळे रात्री कॅम्प फायर ही टेंट मध्येच होईल. जेवण झाल्यावर आमच्या जोशी गटातील फक्त मीच कॅम्प फायर ला जातीने हजर होतो. प्रत्येकाने आपापली कलाकारी करून दाखवली, मी सोनुपाजीच्या(ये मुंडा सबसे ज्यादा छा गया ट्रेक मे) आग्रहावरून मी ‘मल्हारवारी’ म्हणले. स्वत मुलमुले साहेबांनी गाण्याची काही अदाकारी पेश केली. त्या दिवशी सुद्धा कॅम्प फायर ला उपस्थिती मोजकीच होती. रात्री दुध पिऊन शांत चित्ताने मी रात्री ९.३० वाजता झोपलो


No comments:

Post a Comment